इंग्रजांनी सुरत येथे पहिली वखार कधी स्थापन केली?www.marathihelp.com

इंग्रजांनी सुरत येथे पहिली वखार कधी स्थापन केली?
इंग्रजांनी इ. स. १६१५ मध्ये मुघल बादशहा जहांगिरकडून सुरत येथे वखार स्थापण करण्याची परवानगी मिळवली. सुरुवातीस ईस्ट इंडिया कंपनीने भारतात फक्त व्यापार करण्याचे धोरण अवलंबिले होते.

इंग्रजः-

इंग्रजांनी इ.स. १६०० मध्ये भारताबरोबर व्यापार करण्याकरिता ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रज भारतात आले तेव्हा उत्तर भारतात मुघलांची सत्ता होती. इंग्रजांनी इ.स. १६१५ मध्ये मुघल बादशहा जहांगिरकडून सुरत येथे वखार स्थापण करण्याची परवानगी मिळवली. सुरुवातीस ईस्ट इंडिया कंपनीने भारतात फक्त व्यापार करण्याचे धोरण अवलंबिले होते. औरंगजेब बादशाहच्या मृत्यूनंतर सरदारांनी आपापसातील मतभेदांमुळे मुघल सत्ता कमकुवत झाली. या काळात भारतात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यामुळे इंग्रजांनी भारताच्या राजकारणात लक्ष्य द्यायला सुरुवात केली.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 13:46 ( 1 year ago) 5 Answer 6231 +22