उच्च स्तरीय व्यवस्थापनाचे कार्ये काय आहे?www.marathihelp.com

उच्चस्तरीय व्यवस्थापन :

संचालक, कार्यकारी संचालक आणि मुख्य व्यवस्थापक ह्या व्यक्तींचा प्रामुख्याने उच्च स्तरीय व्यवस्थापनात समावेश होतो. कंपनीच्या चिटणीसाला व्यापक स्वरूपाचे अधिकार दिले जात असल्याने त्याचाही समावेश त्यात होऊ शकतो. निर्णय घेणे, योजना तयार करणे, धोरणे निर्धारित करणे व धोरणांचे मूल्यमापन करणे ही प्रमुख कार्ये उच्च स्तरीय व्यवस्थापनाला करावी लागत असल्याने त्याची भूमिका एकूण व्यवसाय-व्यवस्थापनात फार महत्त्वाची ठरते.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 14:27 ( 1 year ago) 5 Answer 4144 +22