प्राचीन मानव व त्याची संस्कृती यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?www.marathihelp.com

प्राचीन मानव व त्याची संस्कृती यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात?

पुरातत्त्वशास्त्र म्हणजे प्राचीन मानवी समाजाचे अध्ययन आहे. ते करण्यासाठी प्राचीन लोकांनी मागे सोडलेल्या अवशेषांचा शोध घेऊन व त्यांचे सखोल निरीक्षण करावे लागते. निरीक्षणातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करतात. त्यासाठी त्या जुन्या कालखंडातील हवामान, भौगोलिक परिस्थिती, ज्ञात इतिहास आणि एकूणच तत्कालीन पर्यावरण विचारात घेतात. यांत अनेक गोष्टींचा अंतर्भाव असल्यामुळे, हे शास्त्र विज्ञान व मानवशास्त्र अशा दोन्ही विभागांत समजले जाऊ शकते. प्राचीन भारतीय इतिहासाची पुरावे हे पुरातत्त्व अभ्यासाच्या आधारे मिळालेले आहेत ज्या प्रमाणे सिंधू संस्कृती हडप्पाकालीन स्थळे या सर्व घटकांचा अभ्यास पुरातत्त्व शास्त्राच्या माध्यमातून केला गेलेला आहे

पुरातत्त्वशास्त्र हे मानव जातीचा इतिहास शोधते. सुमारे २.५ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत मानवाने प्रथमतः तयार केलेल्या दगडी हत्यारापासून ते नजीकच्या काही दशकांपर्यंतच्या काळाचा अभ्यास या विषयात येतो. त्याकाळचा अभास करण्यास इतिहासकारांना काहीच साधन लिखित स्वरूपात उपलब्ध नसते. हा काळ म्हणजे मानवी इतिहासाच्या एकूण काळापैकी सुमारे ९९ % काळ आहे. म्हणज्र प्रागैतिहासिक ते साक्षरतेचा प्रसार होईपर्यंतचा काळ. पुरातत्त्वशास्त्राचा उद्देश मानवी उत्क्रांतीपासून ते सांस्कृतिक उत्क्रांतीपर्यंतचा सांस्कृतिक इतिहास जाणून घेणे हा आहे.

पुरातत्त्वशास्त्रात खालील गोष्टींचा अंतर्भाव होतो. निरीक्षण व सर्वेक्षण, उत्खनन आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्खननानंतरचे विश्लेषण. यानंतर पुरातन काळाची अधिक माहिती मिळू शकते. व्यापक अर्थाने, पुरातत्त्वशास्त्र हे परस्परावलंबी शाखांतील शोधांवर अवलंबून आहे. त्या शाखा म्हणजे इतिहास, कलेचा इतिहास, वैज्ञानिक शास्त्रे, भूगर्भशास्त्र,[४][५][६] तसेच भाषाशास्त्र, भौतिकशास्त्र, माहिती विज्ञान, रसायन शास्त्र, संख्याशास्त्र, जीवशास्त्राच्या इतर शाखा पुरापर्यावरणशास्त्र(paleoecology), paleontology, पुराप्राणिशास्त्र(paleozoology), paleoethnobotany, व पुराजीव शास्त्र(paleobotany)

१९व्या शतकात युरोपमध्ये पुरातनधर्म म्हणून या शाखेचा उदय झाला. त्यानंतर संपूर्ण जगात ही एक विद्याशाखा म्हणून मान्यता पावली. शास्त्राच्या विस्तारादरम्यान अनेक विद्याशाखांचा विकास झाला. पुरातत्त्वशास्त्रास साहाय्यभूत ठरणारी अनेक वेगवेगळी वैज्ञानिक तंत्रे विकसित करण्यात आली. या शास्त्रास नकली पुरातत्त्वशास्त्र यापासून ते मानवी अवशेषांच्या उत्खननास विरोध अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 13:34 ( 1 year ago) 5 Answer 5729 +22