भारताला भारत का म्हणतात?www.marathihelp.com

भारताला भारत हे नाव कसे मिळाले याविषयी दोन कथा प्रसिद्ध आहेत. काही जाणकारांच्या मते चंद्रवंशी राजा दुष्यंत आणि विश्वामित्राची कन्या शकुंतला यांचा मुलगा भरत ! याच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे संबोधल्या जाते.

ऋग्वेदानुसार भारताचे नाव सूर्यवंशी राजा भरताच्या नावावरून पडले आहे. ऋग्वेदाची व्याख्या करणाऱ्या वेदाभ्यासकांच्या मते मनूवंशज ऋषभदेवांचे दोन पुत्र होते भरत आणि बाहुबली ! बाहुबलीच्या वैराग्य प्राप्तीनंतर भरताला चक्रवर्ती सम्राट बनविण्यात आले.

आणि तेंव्हापासून आपल्या देशाला भारतवर्ष असे म्हंटल्या जाऊ लागले. आणि भरताचे सर्व वंशज आणि या देशातील मूळ रहिवाश्यांना भारती असे म्हंटल्या गेले.

आणि बहुदा यामुळेच कौरव आणि पांडवांच्यात झालेल्या युद्धाला महाभारत असे संबोधल्या गेले असावे. कारण महाभारताची समीक्षा करणाऱ्यांच्या मते महाभारताचे युद्ध भारतीयांच्या हक्काकरता लढल्या गेल्याने त्याला महाभारताचे युद्ध हे नाव देण्यात आले.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 1003 +22