माहिती तंत्रज्ञानाची शिक्षण क्षेत्रात गरज का निर्माण झाली?www.marathihelp.com

'शैक्षणिक तंत्रज्ञान हे शास्त्रीय ज्ञानाचे सुनियोजित उपयोजन आहे. अध्ययन, अध्यापन व प्रशिक्षण यांची परिणामकारकता वाढवून विकास साधणारी उपयोजित शाखा आहे".

* शैक्षणिक तंत्रज्ञान आधुनिक कौशल्ये आणि तंत्रांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या आवश्यकतांशी संबंधित आहे. यामध्ये माध्यमे आणि पद्धतींच्या हाताळणीद्वारे शिकण्याची सुविधा आणि पर्यावरणावर नियंत्रण यांचा समावेश होतो कारण हे शिक्षणावर प्रतिबिंबित होते."

"

'शिक्षण आणि प्रशिक्षण त्यांच्या गरजांच्या पूर्तीसाठी लागणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्यांशी शैक्षणिक तंत्रज्ञानाचा संबंध आहे. यामध्ये अध्ययन प्रक्रियेला सहज सोपी बनविणे, यासाठी पध्दती, साधनांचा उपयोग करणे व अध्ययन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे याही गोष्टींचा समावेश होतो".



"शिक्षण आणि प्रशिक्षण त्यांच्या गरजांच्या पूर्तीसाठी लागणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्यांशी शैक्षणिक तंत्रज्ञानाचा संबंध आहे. यामध्ये अध्ययन प्रक्रियेला सहज सोपी बनविणे, यासाठी पद्धती, साधनांचा उपयोग करणे व अध्ययन परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे याही गोष्टींचा समावेश होतो"..



"तंत्रे, पध्दती आणि प्रणाली यांचा विकास, उपाययोजना आणि मूल्यमापन म्हणजे शैक्षणिक तंत्रज्ञान असून ते मानवी अध्ययनाच्या क्षेत्रास मदत करते.

शैक्षणिक तंत्रविज्ञान ही एक व्यापक संकल्पना आहे. शिक्षणाची ध्येय व उद्दिष्ट्ये निश्चित करुन ती साध्य करण्यासाठी विविध यंत्रे, तंत्रे मार्ग, पध्दती इत्यादींचा शोध घेणे, त्यांची परिणामकारकता तपासणे व मूल्यमापन करणे याचा समावेश 'शैक्षणिक तंत्रविज्ञान" या संकल्पनेत होतो.१.४ माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाची गरज आणि महत्त्व

आणि तंत्रज्ञानाची अनेक बदल झाले आहे. आज खेडे बनले आहे ज्ञाना मुळे आलेली दिसते. माहिती नागेनामा वहार बदल घडून आले आहेत. नष्ट होते.

माहिती आणि संप्रेषणाची गरज:

मुळे बदलास समरे आणि प्रेमाचा.

नेटमुळे माहितीचा महासागर झाला आहे. ही माहिती प्राप्ती ICT की साथ गरजेची आहे...

समाजाच्या बदलत्या गरजन मरी जाताना वन माहिती प्राप्त मदत करते. विद्यार्थी हा बदलत आहे. पूर्ण ICT शिवाय पर्याय

तंत्रविज्ञानाचा शिक्षण क्षेत्रामध्ये जाणीवपूर्वक वापर दुसऱ्या महायुध्दानंतर सुरु झाला. साधारणतः १९४० च्या सुमारास समूह संप्रेषणासाठी रेडिओ, दूरदर्शन यांचा वापर सुरु झाला. शिक्षकांची संख्या न वाढविता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे हा या कार्यक्रमाचा हेतू होता. औपचारिक शिक्षणाला याच सुमारास नवीन पर्याय उपलब्ध झाले आणि मुक्त विद्यापीठे व दूरशिक्षण या नव्या संकल्पना उदयास आल्या.

१९५० नंतर शिक्षणावर मानसशास्त्राची पकड दिसून येते. वर्तनवादाचा पगडा शैक्षणिक तंत्रविज्ञानावर दिसून येतो. त्यामुळे वैयक्तिक अध्ययनाला महत्त्व देऊन क्रमन्वित अध्ययनासारखे तंत्रज्ञान विकसित झाले. त्यानंतरच्या काळात समूह अध्ययनाला महत्त्व प्राप्त झाले.

२० व्या शतकाच्या अखेरीपासून संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचे जाल पसरण्यास सुरुवात झाली. आज शैक्षणिक तंत्रज्ञान हा माहिती तंत्रज्ञानाचा एक भाग मानला जातो. औपचारिक वर्गाचे स्वरुप •बदलून Interactive Media चा वापर वर्गात केला जातो. ऑन लाईन लर्निंग व ऑन लाइन परीक्षांच्या वापरामुळे शिक्षण प्रक्रिया अधिकाधिक तंत्रविज्ञान केंद्रित आणि विद्यार्थीकेंद्रित बनली आहे, अर्थातच शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यात याचा हातभार लागत आहे.

१.६ शैक्षणिक तंत्रविज्ञानातील नवीन संकल्पना

आज शैक्षणिक तंत्रज्ञान म्हणजे अध्ययन, अध्यापन प्रभावी करण्यासाठी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर विविधतेने करण्यात येत असलेला आज आढळून येतो. माहिती तंत्रज्ञानात जसजशी प्रगती घडून येते, तसतसे शिक्षणक्षेत्रातील त्याच्या वापराबद्दल बुध्दिमंथनही घडून येते. आज अत्याधुनिक संकल्पना शिक्षणक्षेत्रात वापरल्या जात आहेत.

आज मोबाईल ही माणसाची गरजच बनली आहे, तेव्हा त्याचा वापर शिक्षणक्षेत्रात न होईल तर नवलच. आज ३G तंत्रज्ञानामुळे मोबाईलचा वापर अध्ययनात सहजतेने कल्पकतेने करता येतोय. परिक्षेच्या सरावाकरिता मोबाईलद्वारे प्रश्न व उत्तराची देवाणघेवाणही करता येते. 'm-learning' हा शिक्षणाचा आमुलाग्र भाग बनू पाहतोय.इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे वेब बेस्ड टेक्नॉलॉजीचा वापर शिक्षणात केला जातोय. स्वयं अध्ययन तसेच दूरशिक्षणात याच्या वापरावर भर देण्यात येतोय.

स्मार्टबोर्ड टेक्नॉलॉजी हा प्रोजक्टरच्या पुढचा टप्पा आहे. अध्ययन प्रक्रिया अधिकाधिक आनंददायी बनली आहे, तसेच वर्गाध्यायनाचा चेहराच पूर्णतः बदलून गेला आहे.

या आणि अशा नवनवीन संकल्पना शिक्षणक्षेत्रात वापरण्यावर भर दिला जात आहे, ज्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढण्यात हातभार लागत आहे.

१.७ सारांश

रेडिओ, टि. व्ही., इंटरनेट, टेलिकम्युनिकेशन व व्हिडीओ कॉन्फरन्स यांसारख्या माध्यमाद्वारे वितरित होणाऱ्या माहितीच्या देवाणघेवाणीचे तंत्र म्हणजे 9 माहिती तंत्रविज्ञान" होय.

माहितीच्या संप्रेषण प्रसारासाठी साधनांचा वापर करणे म्हणजे संप्रेषण तंत्रज्ञान.

माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण प्रक्रिया प्रभावी बनविण्यासाठी करणे म्हणजेच शैक्षणिक तंत्रज्ञान होय.

समाजाच्या बदलत्या गरजा व तंत्रज्ञानाची क्रांती यानुरूप शिक्षणक्षेत्रात अनेक बदल घडून आले.

माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शिक्षणप्रक्रिया अधिक प्रभावी, विद्यार्थीकेंद्रि, आनंददायी, सहज बनली आहे.

आजही तंत्रज्ञानातील बदलांचा प्रभाव शिक्षणक्षेत्रावर पाहण्यास मिळतो.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 13th Dec 2022 : 13:12 ( 1 year ago) 5 Answer 8247 +22