मुक्त संमती म्हणजे काय?www.marathihelp.com

मुक्त संमती म्हणजे काय?
कायद्यानुसार नुसती ‘संमती’ नव्हे, तर ‘मुक्त संमती’ (Free Consent) आवश्यक असते. अशी मुक्त संमती नसेल, तर करार रद्दबातल ठरवता येतो. अर्थात तेव्हाही न्यायालयात अर्ज करून तसे घोषित करून घ्यावे लागते (Law of Contract).

मराठी परिभाषेत ‘संमती’ या शब्दाला अनुमोदन, रुकार, परवानगी असे अनेक समानार्थी शब्द आहेत; परंतु कायद्याच्या परिभाषेत या शब्दाच्या विविध छटा या शब्दाचा अर्थ सांगतीलच, असे नाही. कायद्याच्या परिभाषेत ‘संमती’ असण्याला खूप महत्त्व आहे. ‘संमती’ नसेल, तर त्यामुळे येणारी जबाबदारीही महत्त्वाची ठरते. संमती या शब्दाला विविध कायद्यांमध्ये विविध प्रकारांनी वापरले असून ‘संमती’ नसेल, तर त्याचे वेगवेगळे परिणाम दर्शविले आहेत. उदा., व्यक्तिगत कायद्यात (Personal Laws) वैध विवाहासाठी वधू आणि वराची संमती अत्यावश्यक असते. संमती नसेल, तर ज्याची संमती नसेल त्या व्यक्तीला (वधूला अथवा वराला) विवाह रद्दबातल ठरविता येतो. त्यासाठी न्यायालयात तसा अर्ज करावा लागतो. म्हणजेच संमती नसेल, तर विवाह न्यायालयाकडून अवैध घोषित करून विवाहबंधनातून मुक्त होता येते. तसेच परस्पर संमतीने विवाहित व्यक्ती घटस्फोटही घेऊ शकतात.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 16:53 ( 1 year ago) 5 Answer 6716 +22