स्त्री शिक्षणाचे प्रणेते या ग्रंथाचे कर्ते कोण?www.marathihelp.com

स्त्री शिक्षणाचे प्रणेते या ग्रंथाचे कर्ते कोण?

पश्चिम भारतात, ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी शाळा सुरू केली तेव्हा स्त्री शिक्षणाचे प्रणेते बनले.

स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले :

सावित्रीबाईंचा जन्म

क्रांतीज्योत सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगांव येथील ता. खंडाळा, जि. सातारा येथील खंडोबा सिदूजी नेवसे पाटील व लक्ष्मीबाई यांना कन्यारत्नाच्या रुपाने झाला. खंडोजी पाटील हे व्यवसायाने फुलमाळी व इनामदार घराणे होते. माई या त्यांचे पहिले अपत्य होत्या. माईंना सिंदूजी, सखाराम आणि श्रीपती हे तीन लहान भावंडे होती.

विवाह


फाल्गुन कृष्ण पंचमी, शालिवाहन शक १७६५ (इ.स. १८४०) मध्ये नायगांवला तात्यासाहेब महात्मा ज्योतीबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा विवाह झाला. त्यावेळी माईंचे वय अवघे नऊ वर्षे तर तात्यांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले. फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.

पहिल्या मुख्याध्यापिका


तात्यासाहेब फुले हे शेतात काम करता करता फावल्या वेळात आंब्याच्या झाडाखाली त्यांची विधवा मावस बहीण सगुणाबाई क्षीरसागार व सावित्रीबाईंना शिक्षणाचे धडे देत असत. त्यानंतर मिसेस मिचेल यांनी सगुणाबाई व माईंची परीक्षा त्यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये 1846-1847 मध्ये तिसऱ्या इयत्तेत प्रवेश दिला. या दोघींनीही इ.स.1846 -47 मध्ये चौथे वर्षे पूर्ण केल्यावर त्यांना प्रशिक्षीत शिक्षिका व मुख्याध्यापक बनवले.

मुलींची प्रथम शाळा


1 जानेवारी 1848 रोजी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात प्रथम शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवून त्यात

अन्नपुर्णा जोशी
सुमती मोकाशी
दुर्गा भागवत
माधवी थत्ते
सोनू पवार
जनी कार्डिले या चार ब्राम्हण एक मराठा व एका धनगर जातीच्या मुलींना प्रवेश दिला.

सावित्रीबाईंनी 15 मे 1848 ला अस्पृश्यांच्या मुलांसाठी प्रथम शाळा काढून 1 मे 1849 ला पुणे येथील उस्मानशेख वाड्यात प्रौढासाठी शाळा काढली. त्या शैक्षणिक प्रचार आणि प्रसार करतात, त्यांच्या या कृत्यामुळे सनातन्यांकडून माईंना नेहमीच अंगावर शेण -दगड झेलून घाणेरड्या शिव्या ऐकाव्या लागत. म्हणून माई नेहमी सोबत दोन लुगडे ठेवत असत. इतका त्रास देऊनही माई आपल्या हातातील शैक्षणिक कार्य सोडत नाहीत, हे लक्षात आल्यावर सनातन्यांनी भाडोत्री मारेकरी पाठवले. मात्र त्याचा परिणाम उलट झाला. त्यातील धोंडिराम कुंभार हा तात्यासाहेबांच्या प्रेरणेने पंडित झाला त्याचे "वेदाचार" हे पुस्तक फार गाजले, तर रामोशी रोडे हा "भक्षकच " तात्याचा रक्षक झाला.

अशाप्रकारे शुद्र-अतिशुद्राना शिक्षण देत असल्याच्या कारणाने तात्यासाहेबांना व माईंना इ.स. 1849 ला गृहत्याग करावा लागला. तसेच 14 जानेवारी 1852 मध्ये महिला सेवा मंडळातर्फे पहिला तिळगुळ सभारंभ साजरा केला. तर 16 नोव्हेंबर 1852 ला मेजर कँडीच्या अध्यक्षतेखाली विश्रामबाग वाड्यात फुले दाम्पत्याचा इंग्रज अधिकाऱ्याकडून शैक्षणिक कार्यात उल्लेखणीय कार्य केल्याबद्दल गौरव केला. इ.स. 1848 - 1852 या काळात पुणे, सातारा, नायगांव, नगर, ओतुर, सासवड, भिंगार, मुंढवे, शिरुर, शिरवळ, हडपसर, तळेगांव इत्यादी 18 ठिकाणी शाळा तर 1 डिसेंबर 1854 ला अध्यापक शाळा काढली. तसेच इ.स.1855 मध्ये कामगारांच्या व शेतकऱ्यांसाठी रात्रशाळा काढली.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 6th Dec 2022 : 12:01 ( 1 year ago) 5 Answer 4944 +22