स्वातंत्र्यपूर्व भारतात ब्रिटिशांनी प्रशासनाच्या सोयीसाठी किती प्रांतांची विभागणी केली?www.marathihelp.com

ब्रिटिश भारत किंवा भारताचे साम्राज्य हा १८५८ ते १९४७ दरम्यान ब्रिटिश सरकारच्या सत्तेखाली राहिलेला भारतीय उपखंडातील भाग आहे. सध्याचे भारत ध्वज भारत, पाकिस्तान ध्वज पाकिस्तान व बांगलादेश ध्वज बांगलादेश हे देश ब्रिटिश वसाहतीचा भाग होते. तसेच बर्मा हा प्रांत १८५८ ते १९३७ दरम्यान ब्रिटिश राज्याचा भाग होता. ब्रिटिश वसाहत ढोबळपणे भारत ह्या नावाने ओळखला जात असे.

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध यशस्वीपणे मोडून काढल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली व भारताची सत्ता इंग्लंडची तत्कालीन राणी व्हिक्टोरियाच्या स्वाधीन करण्यात आली. १९४७ साली भारताच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटिश भारताची फाळणी करण्यात आली व भारत व पाकिस्तान ह्या दोन देशांची निर्मिती झाली.


प्रांत


ब्रिटीश राजच्या अखत्यारीत खालील प्रांत होते.

मुख्य प्रांत

ब्रिटीश राजचे प्रांत क्षेत्रफळ (हजार वर्ग मैल) लोकसंख्या
बर्मा(सध्याचा म्यानमार) १७० ९० लाख
बंगाल (सध्याचे बांगलादेश, पश्चिम बंगाल, बिहार व ओडिशा) १५१ ७.५ कोटी
मद्रास(सध्याचे कर्नाटक,केरळ,तामिळनाडू,आंध्रप्रदेश,ओरिसा आणि लक्षद्वीप समूह) १४२ ३.८ कोटी
बॉम्बे(सध्याचे पाकिस्तानातील सिंध,गुजरात,महाराष्ट्र,कर्नाटक आणि आफ्रिकेतील एडन) १२३ १.९ कोटी
संयुक्त प्रांत (सध्याचे उत्तर प्रदेश व उत्तराखंड) १०७ ४.८ कोटी
मध्य प्रांत (सध्याचे मध्य प्रदेश, महाराष्ट्र व छत्तीसगढ) १०४ १.३ कोटी
पंजाब(सध्याचे पंजाब,हरियाणा,हिमाचल प्रदेश आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांत) ९७ २ कोटी
आसाम(सध्याचे आसाम,मेघालय,नागालॅंड,मिझोरम,अरुणाचल प्रदेश) ४९ ६० लाख


इतर प्रांत


प्रांत क्षेत्रफळ (हजार वर्ग मैल) लोकसंख्या
नॉर्थवेस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्स (सध्याचा पाकिस्तान मधील प्रांत) १६ २१.२५ लाख
बलुचिस्तान(सध्याचा पाकिस्तान मधील प्रांत) ४६ ३.०८ लाख
कूर्ग(सध्याचा कर्नाटक राज्यातील जिल्हा) १.६ १.८१ लाख
अजमेर (सध्याचा राजस्थान राज्यातील एक जिल्हा) २.७ ४.७७ लाख
अंदमान आणि निकोबार(भारतातील अंदमान आणि निकोबार बेटे) ३ २५,०००



ब्रिटीश भारतातील संस्थानांच्या एजन्सीज्:-

१. राजपुताना स्टेट एजन्सी

२. डेक्कन स्टेट एजन्सी आणि कोल्हापूर रेसिडेन्सी

३. पटियाला आणि पूर्व पंजाब स्टेट एजन्सी

४. बलुचिस्तान एजन्सी

५. ग्वाल्हेर रेसिडेन्सी

६. वायव्य सीमांत स्टेट एजन्सी

७. गिलगीत एजन्सी

८. गुजरात स्टेट एजन्सी आणि वडोदरा रेसिडेन्सी

९. मध्य भारत एजन्सी

१०. पूर्वीय स्टेट एजन्सी

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 10:41 ( 1 year ago) 5 Answer 5480 +22