प्रदुषण म्हणजे काय वायुप्रदुषणाचे वर्गीकरण करून प्रदुषणाचे स्त्रोत सांगा?www.marathihelp.com

वातावरणात ,पाण्यात, हवेत किंवा अन्‍नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात.
प्रदूषण ही समस्या दिवेसंदिवस वाढतच आहे,औद्योगिक कचरा थेट मातीत, पाण्यामध्ये आणि हवेत मिसळत आहे. एवढे असूनही लोक प्रदूषणाला आणि त्याच्या परिणामाला गांभीर्याने घेत नाही आहेत.

वायू प्रदूषण:
वायू प्रदूषण म्‍हणजे हवेमध्‍ये घातक दूषित पदार्थांचे मिश्रण होणे. वायू प्रदूषणामुळे आरोग्‍य समस्‍या उद्भवू शकतात तसेच ह्यामुळे पर्यावरण व संपत्तीची हानी होऊ शकते. ह्याच्‍यामुळे वातावरणातील (पृथ्‍वीच्‍या सभोवताली असलेल्‍या वातावरणात) संरक्षक ओझोन थर पातळ होऊ लागला आहे (त्‍या थराचे घनत्‍व कमी झाले आहे) परिणामी हवामानात बदल घडून येत आहेत. उद्योग, वाहने, लोकसंख्‍येतील वाढ, आणि शहरीकरण हे वायू प्रदूषणास जबाबदार असणारे काही प्रमुख घटक आहेत. वायू प्रदूषण पुष्‍कळशा कारणांचा परिणाम आहे, सर्वच कारणे मानवी नियंत्रणाखाली नाहीत. वाळवंटातील धुळीची वादळे व जंगलातील आगीचा धूर तसेच गवतास लागणारी आग हे सर्व देखील वायू प्रदूषणाच्‍या रासायनिक व विशेष प्रदूषणात आपला वाटा उचलतात.

काही मुख्य वायूप्रदूषक घटक आणित् यांचे स्त्रोत दिलेले आहेत:
कार्बन मोनोक्‍साइड (CO) एक रंगहीन, गंधहीन वायू आहे जो कार्बन आधारित इंधने अर्धवट जाळण्‍याने उत्‍पन्न होतो जसे पेट्रोल, डिझेल आणि लाकडे. सिगरेटसारख्‍या नैसर्गिक व कृत्रिम उत्‍पादनांच्‍या जळण्‍यामुळेदेखील हे उत्‍पन्न होतात. आपल्‍या शरीरात प्रवेश करणार्‍या प्राणवायूचे प्रमाण कमी करतो. ह्यामुळे आपली हालचाल मंदावते आणि आपणांस झोप येऊन आपण गोंधळात पडू शकतो.
कार्बन डायऑक्‍साइड (CO2) एक प्रमुख हरितगृह वायू आहे. कोळसा, तेल, आणि नैसर्गिक वायू जाळणे ह्यासारख्‍या मानवी क्रियांचा हा परिणाम आहे.
क्‍लोरोफ्लोरोकार्बन्‍स् (CFC) गॅसेसचे उत्‍सर्जन मुख्‍यत्‍वे एअर कंडीशनर आणि रेफ्रिजरेटर्समधून होते. जेव्‍हां वायूशी ह्यांचा संयोग वायूशी घडून येतो, CFC स्‍ट्रेटोस्फियर पर्यंत वर जातात आणि तेथे त्‍यांचा संपर्क काही इतर वायूंशी घडून येतो, ज्‍यामुळे सूर्याच्‍या हानिकारक अल्‍ट्राव्‍हायोलेट किरणांपासून पृथ्‍वीचे संरक्षण करणार्‍या ओझोन थराचा ह्रास होत आहे.
शिसे हे पेट्रोल, डिझेल, शिश्‍याच्‍या बॅटर्‍या, पेंटस्, हेयर डाय उत्‍पादने इत्‍यादींमध्‍ये असतात. विशेषत: लहान मुलांवर शिश्‍याचा वाईट परिणाम होतो. काही वेळा ह्याच्‍यामुळे संपूर्ण नाडी तंत्रास हानि पोचू शकते, पचन क्रियेसंबंधी समस्‍या बळावू शकतात आणि काही वेळा कर्करोग देखील होऊ शकतो.
ओझोन पृथ्‍वी सभोवताली असलेल्‍या वातावरणाच्‍या वरील थरांमध्‍ये नैसर्गिक स्‍वरूपातच असतो. हा महत्‍वपूर्ण वायू सूर्याच्‍या हानिकारक अल्‍ट्राव्‍हायोलेट किरणांपासून पृथ्‍वीचे संरक्षण एखाद्या ढालीप्रमाणे करतो. तथापि, जमिनीच्‍या पातळीवर, हा उच्‍च विषारी प्रभाव असणारा एक प्रदूषण घटक आहे. वाहने व कारखाने हे जमिनीच्‍या पातळीच्‍या ओझोन उत्‍सर्जनाचे मुख्‍य स्‍त्रोत आहेत. ओझोनमुळे डोळ्यांस खाज सुटते, जळजळ होते व डोळ्यांतून पाणीही वाहते. ह्याच्‍यामुळे सर्दी-पडसे आणि न्‍युमोनियाच्‍या विरूध्‍द आपली रोगप्रतिकारक शक्ति कमी होते.
नायट्रोजन ऑक्‍साइडमुळे (Nox) ह्यामुळे काळे धुके तसेच आम्‍लयुक्‍त पाऊस पडतो. पेट्रोल, डिझेल आणि कोळसा यांसारखी इंधने जाळण्‍याने हा उत्‍पन्न होतो. हिवाळ्यात नायट्रोजन ऑक्‍साइडमुळे मुलांना श्‍वसनसंबंधी आजार होण्‍याची शक्‍यता असते.
हवेमध्‍ये तरंगणारे कणस्‍वरूप पदार्थ (SPM) हवेमध्‍ये धूर, धूळ, आणि वाफेच्‍या स्‍वरूपात खूप वेळपर्यंत तरंगणारे घन पदार्थकण असतात आणि हे धुक्‍याचे मुख्‍य स्‍त्रोत असल्‍याने अंधत्‍वासही कारण ठरू शकतात किंवा अंधुक दिसू लागते. ह्यांतील बारीक कण, जेव्‍हां श्‍वासाबरोबर शरीरात प्रवेश करतात तेव्‍हां ते आपल्‍या फुफ्फुसांमध्‍ये जाऊन बसतात आणि मग फुफ्फुसांना हानि पोचून श्‍वसनसंबंधी त्रास सुरू होतो.
सल्‍फर डायऑक्‍साइड (SO2) हा वायू प्रामुख्‍याने कोळसा जाळल्‍यावर उत्‍पन्न होतो, मुख्‍यत्‍वे औष्णिक विद्युत केंद्रांतून. काही औद्योगिक प्रकियांमुळे, उदा. कागद तयार करणे आणि धातू वितळविणे इ. मुळे सल्‍फर डायऑक्‍साइड उत्‍पन्‍न होतो. काळे धुके व आम्‍लयुक्‍त पाऊस ह्यांचा हा मुख्‍य कारण घटक आहे. ह्याच्‍यामुळे फुफ्फुसांचे आजार होऊ शकतात.

solved 5
General Knowledge Saturday 15th Oct 2022 : 09:21 ( 1 year ago) 5 Answer 1036 +22